वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू

Foto
खुलताबाद, (प्रतिनिधी) खुलताबाद फुलंब्री महामार्गावरील भडजी गावाजवळ शुक्रवारी (ता. १३) मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात ३५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. 

अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत हा तरुण गंभीर जखमी झाला होता, मात्र वेळेत मदत न मिळाल्याने त्याची प्राणज्योत मालवली. गोरख कुकलारे गोरख शामलाल कुकलारे (वय ३५, रा. पडेगाव, छत्रपती संभाजीनगर, मूळ गाव तीसगाव, पंढरपूर) असे मृताचे नाव आहे. व्यवसायाने ट्रैक्टर चालक असलेले गोरख शुक्रवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास पायी फुलंब्री गेवराई परिसरातील सासरवाडीकडे निघाले होते.